आमदार चषक स्पर्धेत मा. बाबासाहेब (तात्या) कोडग युथ फाऊंडेशन आवंडी संघाचा तिसरा क्रमांक


जत/प्रतिनिधी: आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिडासंकुल जत येथे आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आवंढी ता.जत येथील बाबासाहेब(तात्या) कोडग युथ फौंडेशन या संघाने सहभागी होऊन चांगल्या प्रकारची खेळी करत तिसऱ्या क्रमांकाचे पंचवीस हजार रुपये रोख व चषक पटकाविले यावेळी  आ. विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते विजयी संघातील खेळाडूंना चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आले.

        स्पर्धेत तालुका व तालुक्या बाहेरील असे एकुण तीस पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. त्यामधुन सर्वोत्कृष्ट संघनायक म्हणुन आवंढी संघाचा कर्णधार सचिन कोडग यांस पारितोषिक देण्यात आले. विश्वजित लॉजिस्टिक चे मालक मनोहर कोडग शेठ यांचेकडुनही या स्पर्धेत आवंढी संघाने चांगली कामगिरी केल्याबद्दल रोख पाच हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेत आवंढी संघाला फायटर बी, फायटर ए, खंडनाळ, कोल्हापूर या संघांचा सामना करावा लागला. कर्णधार सचिन बरोबरच अमित, विशाल, विकास, रणजित, हणमंत, नानासो, राहुल, बाबु, आमोल, कुलदिप या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. बाबासाहेब (तात्या) कोडग युथ फौंडेशन संघाला माजी उपसरपंच प्रदिपदादा कोडग, जत तालुका युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव कोडग, मनोज कोडग शेठ, मेजर आकाश कोडग, रमेश कोडग, श्रीरंगभाऊ कोडग, विश्वास कोडग, मनोहर कोडग यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच जत फायटर टीम व एस. जे. स्पोर्ट चे सुमित जगधने, जत शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आकाश बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments