गुड्डापूर देवस्थानच्या विश्वस्तांकडून १५ कोटीचा गैरव्यवहार चेअरमनसह संचालकांवर गुन्हा दाखल

तालुक्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात उडाली खळबळ


जत/प्रतिनिधी : कर्नाटक व महाराष्ट्रा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री दान्नमादेवी देवस्थानच्या विश्वस्थ मंडळाकडून गेल्या १० ते १५ वर्षापासून १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार बसवंताप्पा चन्नाप्पा पुजारी (रा. गुड्डापूर) यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे जत तालुक्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

         श्री धात्रमादेवी देवस्थान कमिटीचे चेअरमन प्रकाश शिवाप्पा गणी (वय ७६ रा.तिकोटा जि. विजापूर), चंद्रशेखर रेवाप्पा गोब्बी (वय ६४ रा.जत जि. सांगली), बाळासाहेब शंकर गाढवे (वय ६३ रा.मिरज जि. सांगली), सिदय्या पंचय्या हिरेमठ (वय ७२ रा.सोलापूर), विश्वनाथ शिवाप्पा गणी (वय ७७ रा.विजापूर, कर्नाटक), सदाशिव सम्नुखआप्पा गुड्डोडगी (वय ६४ रा.अथणी जि. बेळगाव) व अन्य दोन जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

         याबाबतीत अधिक माहिती अशी की, दुष्काळी जत तालुक्यातील एकमेव असे गुड्डापूर येथील श्री दानमादेवी देवस्थान आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेकांचे प्रसिद्ध असे श्रध्दास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येत असतात. कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी दिला आहे. शिवाय अनेक भाविक श्रद्धेपोटी व भक्तिभावाने देवीला सोने, चांदी, व रोख रक्कम दान करतात. देवस्थान ट्रस्टचे संचालक कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातील असून देवस्थानच्या चेअरमनसह संचालकांनी देवस्थानात बेकायदेशीर घटना तरतुदी बाहय स्वार्थी हेतूने खूप मोठ्या प्रमाणात स्वतःसाठी केला. देवस्थानचा कारभार धर्मादाय आयुक्त सांगली यांनी दिलेल्या नियमावलीतील तरतुदी नुसार न करता संचालक मंडळानी गेल्या १५ ते २० वर्षात सुमारे १५ कोटी रुपयांचा गैर व्यवहार केला असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वरील सर्वांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments