जत पोलीस अलर्ट; विना मास्क व सोशल डिस्टन्सचे नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई- पोलीस निरीक्षक उत्तम जाधव

कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जत पोलीसठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अलर्ट

जत/प्रतिनिधी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स नियम न पाळणार्यावर कारवाई होणार आहे.महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागल्याने महाराष्ट्र सरकारने व ग्रहमंत्री कार्यालयाने सर्वत्र आदेश जारी केले आहेत. विना मास्क व सोशल डिस्टन्स हे नियम मोड़णाऱ्यावर जत पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. याबाबतची माहिती जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

        यावेळी जाधव म्हणले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पासुन पुन्हा प्राथमिकदृष्ट्या उपाय म्हणून जत पोलिस ठाणे यांच्यावतीने विनामास्क फिरणारे व्यक्ती, दुकान, हॉटेल्स, मंगल कार्यालय, भाजी मार्केट, सरकारी व निमसरकारी कार्यालय, वित्तीय संस्था आदी ठिकाणी मास्कन लावणारे, दुकानदार व ग्राहक, दुचाकीवरुन जाताना अर्धवट मास्क घालुन फिरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे आदी घटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आपल्याच सुरक्षेसाठी ही मोहीम हाती घ्यावी लागली आहे. तरी सर्वानी मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, सुरक्षित रहा. जे नियम पाळणार नाहीत त्यांचे बाबतीत जत पोलीस कठोर कारवाई करणार असून त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा जत पोलिसांच्या कडून देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments