मराठी भाषेचा वापर वाढायला हवा- अश्विनी खलिपे । मराठी राजभाषा दिनानिमित्त रुद्राक्षा फौंडेशनकडून विविध उपक्रम


सांगली: "भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे..." कुसुमाग्रजांना स्मरून मराठी भाषा दिनानिमित्त रुद्राक्षा फौंडेशन मराठी भाषा जपण्यासाठी, मराठी वापरात येण्यासाठी प्रयत्न करत आहे.

         आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात तसेच धावत्या युगात मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याने, तसेच प्रगतीच्या नावाखाली पालक मुलांना मराठी शाळेत न घालता इंग्लिश मिडियमच्या शाळेत पाठवत असल्याने मराठी भाषेचा वापर भावी पिढीकडून कमी होत आहे, तसेच व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या अति वापरामुळे तरुणपिढीवर इंग्रजीचा जास्त पगडा पडल्यामुळे मराठी भाषेला हानी पोहोचत आहे, हे कुठेतरी थांबायला हवं आणि प्रत्येकाच्या मनामनात मराठी भाषेबद्दल आदर, प्रेम निर्माण होऊन रोजच्या जीवनात मराठी भाषेचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांकडून मराठी भाषा दिनानिमित्त रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष अश्विनी खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी कविता, कथा, परिच्छेद लेखन, तसेच वाचन घेण्यात आले. या उपक्रमाला अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व इथून पुढे रोजच्या जीवनात मराठी भाषेचा वापर करण्याची शपथ घेतली.

         या उपक्रमास सांगली, सातारा, कोल्हापूर, कडेगाव, शिंदेनगर, विटा, वांगी, कराड, अमरापूर, हिंगणगाव, चिखली, घोगाव अशा अनेक ठिकाणहून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात विशाल शेटे, संजीवनी माने, पुनम देवकर, सुप्रिया खाडे, यशोदीप माने, रोशनी सावंत, क्रिशा वाईकर, आयुषी औंधे, सिद्धी माने, स्नेहल पाटील, पूजा खलिपे, ऋतुजा, तेजश्री शिंदे, कोमल शिंदे, धनश्री शिंदे, आर्या शिंदे, प्रतिक्षा शिंदे, अभिजीत शिंदे, स्वप्नाली गाडे, अश्विनी कदम, राजश्री माने, आदिश शिंदे, प्रणव शिंदे, रुद्र शिंदे, अनुज नलवडे, स्वराली शिंदे, ज्ञानेश्वरी शिंदे, श्रेयस शिंदे, आर्या देशमुख, श्रेया शिंदे, श्रेया जयदीप शिंदे, स्वराली संदीप शिंदे, कार्तिकी शिंदे, आसावरी शिंदे, श्रेयस आबासाहेब शिंदे आदींनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments