जतेत शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी


जत/प्रतिनिधी: जत शहरासह तालुक्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जत शहरातील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी किल्ले रामगड येथून आणलेल्या मशालीचे स्वागत केले. यानंतर आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सिंहासनारूढ छ.शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,  माजी सभापती सुरेश शिंदे, केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पुणे विभागाचे संचालक प्रकाश जमदाडे, संजय कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती निमित्त विविध गटातील विद्यार्थ्यांच्या वकृत्व, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.

जत येथील छ.शिवाजी चौकात असलेला चबुतरा मागील सोळा वर्षे शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारूढ पुतळ्याच्या प्रतिक्षेत आहे. चबुतरा तयार करण्याचे काम झाले आहे. राजकीय श्रेयवादामुळे पुतळा बसवण्यास विलंब होत आहे. अश्वारूढ पुतळा बसवावा अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांतूून होत आहे.

Post a Comment

0 Comments