जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत


जत/प्रतिनिधी: मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत हरकत घेणाऱ्या सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या  जिल्ह्यातील एकुन ३१ रिट पिटिशन दाखल झालेल्या होत्या. त्यामध्ये जत तालुक्यातील उमराणी येथील राचवा धर्मा मांग यांनि सुद्धा रिट पिटिशन दाखल केली होती. मा. उच्च न्यायालयाने दि. ५/२/२०२१ रोजी या सर्व ३१ रिट पिटिशनची एकत्रित सुनावणी घेउन सर्व ३१ रिट पिटिशन संबंधित जिल्हाधिकारी महोदय यांच्यासमक्ष दि. ९/२/२०२१ रोजी सकाळी ११:०० वा सुनावणी घेउन निर्णय घेण्यासाठी वर्ग केलेल्या आहेत. यामुळे मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांनी जत तालुक्यातील सर्व ३० ग्रामपंचायतीची दि. ९/२/२०२१ रोजी होणारी सरपंच पदाची निवडणूक स्थगीत केलेली आहे. सदर ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments