जत तालुक्यातील उमदी व बोर्गीत अवैध व्यवसाय जोमात; सामाजिक स्वास्थ धोक्यात ! पोलीस अधीक्षकांना दोन वेळा पत्र; ग्रामपंचायत ठराव देऊनही कारवाई शून्य! आत्ता न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल ?जत वार्ता न्यूज(जॉकेश आदाटे): सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक व जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत उमदी येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत बोर्गीकडील ठराव व मागणीपत्र देऊनही कार्यवाही मात्र शून्य आहे. यावर किंचितसाही परिणाम झाला नसून गेल्या काही महिन्यांपासून जत तालुक्यातील उमदी, बोर्गी बुद्रुक आणि बोर्गी खुर्द येथे अवैध व्यवसायिकांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून अवैद्य मटका, हातभट्टीसह देशी दारू आणि रात्रीच्या वेळेस नदीतून बेसुमार वाळूचा उपसा यासह अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे. एवढे सगळे प्रकार अगदी राजरोसपणे सुरू असतानाही उमदी व जत प्रशासन  आणि उत्पादन शुल्क विभाग मुंग गिळुन गप्प का? याबाबत नागरीकांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर वाढत्या अवैध धंद्यांमुळे या भागातील सामाजिक स्वास्थास धोका निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय असा गंभीर सवाल जनतेकडून विचारल्या जात आहे ?

          सांगली व विजयपूर जिल्हा सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील बोर्गी बुद्रुक आणि खुर्द ही कमी लोकसंख्या वस्तीची गावे आहेत. ही दोन्ही गावे कोरडा भीमा नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. मटका आणि तीनपानी जुगार अड्ड्यामुळे तर येथील गोरगरीबांची घरे लुटली जात आहे. मटक्यामुळे काहींचे संसार उघड्यावर आले आहे. मटका खेळुन कर्जबाजारीने काहींनी तर वाम मार्गाचा अवलंब केला आहे. याशिवाय येथे हातभट्टी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत. मुबलक प्रमाणात देशी दारूचाही पुरवठा या गावात केला जात असल्याची माहिती पोलिसांना आहे. मटका आणि दारु या महापुराबरोबरच विविध अवैद्य धंद्याचे या भागाला नव्याने ग्रहण लागलेले असून युवा वर्गाचा प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीकडे कल वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय तस्करांनी विविध व्यवसाय चालविण्यात मजल मारल्याचे स्पष्ट होते. तर रात्रपाळीच्या वेळी तालुक्यांतील बोर नदीतून जेसीबीच्या साहाय्याने चोरटी वाहतूकीद्वारे वाळू तस्करी सुरु आहे. एवढे सगळे काही उघडपणे होत असताना प्रशासकीय अधिकारी मात्र मुंग गिळून गप्प का? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. 

          अगदी सैराट पणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यात सध्या हा भाग अवैद्य व्यवसायाचा हब बनला आहे. असे रूप प्राप्त झाले असून अगदी राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे जत तालुक्यातील सामाजिक स्वस्थ्यास धोक्याची-घंटा निर्माण झाली आहे. अवैद्य दारू विक्रीमुळे तालुक्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक वाढले आहे. वाममार्गाला लागून अनेक तरुण कर्जबाजारी आणि खाजगी सावकाराच्या नादाला लागून घेऊन आत्महत्या सारख्या घटनेला बळी पडतात. असे अनेक घटना ताजी असताना येथील पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाच्या प्रशासनाने मात्र या सर्वच घटनेकडे कानाडोळा केल्याने मटका लावून घेणारे आणि दारू विक्री करणारे मात्र खुलेआम दारू विक्री करीत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे व्यवसाय करणाऱ्या अवैद्य व्यावसायिकांवर आवर घालणार कोण? असा देखील सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

  •            सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार घेतलेले श्रीयुत दीक्षित गेडाम एक धडाकेबाज तरूण अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध शहरातील अवैध्य व्यवसायाविरोधात कंबर कसली होती. एक धडाकेबाज व कडक शिस्तीचे तरूण अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वी गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला आहे. अट्टल गुन्हेगारांविरूध्द मोहिमच राबवली आहे. त्यापैकी बहूतांशी गुन्हेगारांना हद्दपार केले. जिल्ह्यात कायम कायदा व सूव्यवस्था चांगली रहावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहे. त्यामूळेच कोणाही समाजकंटकांनी, उपद्रवी व्यक्तींनी दहशतीपोटी डोकेवर काढण्याचे धाडस केले नाही. याशिवाय मटका, जूगार, अवैध दारू विक्री अन्य अवैध व्यवसायाविरूध्दच्या त्यांच्या मोहिमांही गाजल्या आहेत.

          दरम्यान जत तालुक्यातील बोर्गी बुद्रुक ग्रामपंचायत कडून यापूर्वी सांगली जिल्हा अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांना सहा महिन्यांत दोन वेळा ग्रामसभा घेऊन अवैध धंदे बंद करणेबाबत ग्रामसभेचे मागणी पत्र पाठवुन आग्रहाची विनंती केली आहे. परंतु या मागणीकडे म्हणावे अशी दखल उमदी किंवा अन्य विभागाकडून घेण्यात आले नसल्याने त्या दिलेल्या मागणी पत्राला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप बोर्गी ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच राघवेंद्र होनमोरे यांनी केला आहे. एखादी जुजबी कारवाई करून त्याची नौटंकी मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि पुढे महिने-दोन महिने परिस्थिती जैसे थे राहते. ही या भागातील सार्वत्रिक स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोर्गीचे सरपंच होनमोरे म्हणाले आहे की, निवेदन व अर्ज विनंत्या करून आम्ही ग्रामस्थ पोलिसांच्या या कारभाराला वैतागलेले आहोत. जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकारयांनी जुजबी आणि कारवाईचे फार्स न करता ही बिनबोभाट आणि समाजविघातक धंदे कायमस्वरूपी बंद करणे आवश्यक आहे. पोलिसांनी आमच्या मागणीचा विचार करून तात्काळ कारवाईचे आदेश देऊन, रसातळाला चाललेली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. आम्ही सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी त्यांच्याबरोबर पाठिशी राहू.

             - बोर्गी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच राघवेंद्र होनमोरे

Post a Comment

0 Comments