जत शहरातील गांधी चौक ते वाचनालय चौक या रस्त्यावर गतीरोधक तयार करावे; योगेश मोटे


जत/प्रतिनिधी: जत शहरातील गांधी चौक ते वाचनालय चौक या परिसरात मंगळवारी आणि गुरुवारी बाजार भरला जातो. या बाजारासाठी तालुक्यातील अनेक नागरिक येथे येत असतात. तसेच या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालक वाहन चालवत असतात. तसेच शाळकरी मुले ही मोट्या प्रमाणात जात असतात. त्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत असतो. याचा नाहक त्रास व्यापारी व शाळकरी मुलांना होत आहे. सदरच्या रस्त्यावर दोन ठिकाणी गती रोधक तयार करावे या मागणीचे निवेदन युवक नेते योगेश बाबा मोटे यांनी जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना दिले. यावेळी शिक्षण सभापती प्रकाश माने उपस्थित होते.

        यावेळी बोलताना युवक नेते योगेश बाबा मोटे बोलताना म्हणाले की, गांधी चौक ते वाचनालय चौक या ठिकाणी मंगळवारी व गुरुवारी बाजार भरत असतो. तसेच रस्त्यावरून जात असणाऱ्या शाळकरी मुलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदरच्या रस्त्यावर तात्काळ गती रोधक तयार करावे असे यावेळी बोलताना मोटे म्हणाले.

Post a Comment

0 Comments