संख येथे खोकीधारकांवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कुऱ्हाड । शंभरहून अधिक अतिक्रमणे काढलीजत/प्रतिनिधी: संख (ता.जत) येथील बसस्थानक परिसरात शासकीय हद्दीत अतिक्रमण केलेले सर्व खोके सार्वजनिक बांधकाम विभागाने काढण्याची कारवाई केली. ही कारवाई दुपारी पोलीस बंदोबस्तत करण्यात आली. यामध्ये पानटपरी, चहागाडा, सलून दुकान, फुलांचे दुकान, कापड दुकान, इलेक्ट्रिकल दुकान , अशा अनेक खोके अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खोके मालकांना आठ दिवसात काढून घेण्यासाठी नोटिसाद्वारे कळविण्यात आले होते. परंतु खोके न काढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने उमदी पोलीसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण केलेले सर्व खोके हटविण्यात आले. 

        या कारवाई उप अभियंता डी.पी.डोंगरे, शाखा अभियंता, पी. पी .शिंदे कनिष्ठ अभियंता, आर. बी. राजगे ,स्थापत्य अभियंता सहाय्यक डी.एम.कारंडे, मैलकुली मजूर यांनी कारवाईत भाग घेतला.

*छोटे व्यावसायिकांच्या पोटावर पाय : 

आगोदरच कोरोनाने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आसताना आता कुठे धंद्याला उभारी मिळते तो पर्यंत अतिक्रमणाची कारवाई केल्याने छोट्या व्यावसायकांना उपासमारीची वेळ आहे. 

यामध्ये बसस्थानक परिसरातील पानटपरी, चहागाडा, सलून दुकान, फुलांचा दुकान, कापडयाचे दुकान, इलेक्ट्रिकल दुकाने अशी अनेक खोके उभा करुन व्यवसाय सुरू केला होता. आता तो व्यवसाय बंद होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन अतिक्रमण हटविण्याची गरज होती.

Post a Comment

0 Comments