जत/प्रतिनिधी: जत येथील आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका युवक काँग्रेस व फायटर क्रिकेट क्लब यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट २०२१ च्या पहिल्या विजेत्या चषकावर कोल्हापूरच्या कर्णवीर प्रतिष्ठान संघाने विजय मिळवला, विजेत्या संघास प्रथम क्रमांकाचे ७५००० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या पाच दिवस सुरू असणाऱ्या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या संघांना आ. सावंत, प्रांत अधिकारी प्रशांत आवटी, आयाज मुल्ला, उदय मामा शिंदे, नगर परिषद बांधकाम सभापती नामदेव आण्णा काळे, निलेश बामणे, काँग्रेस नेते सुजयनाना शिंदे, आकाश बनसोडे, यांच्याहस्ते चषक देण्यात आले. आ. सावंत यांनी सर्व विजेत्या संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धेत द्वितीय क्रमांक विश्वजित कदम युथ फाऊंडेशन कवठेमहांकाळ यांनी तर तृतीय क्रमांक-बाबासाहेब (तात्या) कोडग क्रिकेट क्लब, आवंढी ता जत, चतुर्थ क्रमांक-सोन्याळ क्रिकेट क्लब, सोन्याळ यांनी पटकावले. या तीन संघांना अनुक्रमे ५० हजार, २५, १० हजार रुपये अशी पारितोषिके व चषक देऊन गौरविले. तर मॅन ऑफ दि सिरीज-स्पोर्ट्स सायकलचा मान खेळाडू इमतियाज कोकटनूर, सोन्याळ यांने पटकावला.
यावेळी आयाज मुल्ला, उदय मामा शिंदे, नामदेव आण्णा काळे निलेश बामणे, काँग्रेस नेते सुजयनाना शिंदे, विकास माने, सुभाष कोळी, रमेश कोळेकर, राहुल काळे, परवेज गडीकर, फिरोज मुजावर, आकाश बनसोडे, सलीम पाच्छापूरे, योगेश एडके, योगेश बामणे, सुमित जगधने, सलीम नदाफ, विशाल जेऊर, विनंय अंध्यागार आदी उपस्थित होते.
0 Comments