जत येथे नॅशनल अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिरिंग या इन्स्टिटय़ूटचे उदघाटन


जत/प्रतिनिधी: जत येथे सुरू करण्यात आलेले नॅशनल अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिरिंग या इन्स्टिटय़ूटचे उदघाटन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचे  चिरंजीव धैर्यशील सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

        पारंपारिक शिक्षण पद्धती पेक्षा फायर अॅण्ड सेफ्टी या नवीन क्षेत्रात प्रवेश घेऊन १००% नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे कोर्सेस या इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून उपलब्ध करून देनेत येत आहोत. औध्योगिक सुरक्षितता ही एक काळाची गरज आहे. आणि आपली तसेच आपल्या कुटूबियांची सुरक्षितता तसेच फायर अॅन्ड सेफ्टी क्षेत्रात करियर करण्याची सुवर्ण संधी या इन्स्टिटय़ूट मध्ये उपलब्ध असून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनि याचा लाभ घ्यावा अशी माहिती इन्स्टिटय़ूटचे संस्थापक सलमान नदाफ व अमोल घागरे यांनी सांगितले.

        यावेळी विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज ऊर्फ बाळ निकम, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम पाच्छापूरे, जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, शिक्षण सभापती प्रकाश माने, इमरान गवंडी, फिरोज भाई नदाफ तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments