जतरोड (वाळेखिंडी) येथे कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस स्वागत; जत तालुक्यातील एकमेव स्टेशन असलेल्या जतरोड (वाळेखिंडी) येथून आठवड्यातून एकदा धावणार दीक्षाभूमी एक्सप्रेस


जत/प्रतिनिधी: शिवजयंतीच्या शूभमुहूर्तावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-धनबाद या दीक्षाभूमी साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडीचे जत तालुक्यात एकमेव असणाऱ्या जतरोड (वाळेखिंडी) या स्टेशनवर शुक्रवारी सकाळी स्वागत करण्यात आले. या लांब पल्याच्या गाडीला थांबा मिळाल्याने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

       या एक्सप्रेसच्या नियोजनात जत रोड स्टेशन हा थांबा नव्हता, या गाडीच्या थांब्यासाठी शामसुंदर जी मनधना व प्रकाश जमदाडे (केंद्रीय रेल्वे बोर्ड सल्लागार समिती सदस्य सोलापूर विभाग), एन. डी. शिंदे सर, नझिर नदाफ, किरण इथापे यांनी प्रयत्न केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

       वाळेखिंडी येथे जत तालुक्यातील एकमेव स्टेशन आहे. परंतु अनेक लांब पल्याच्या गाड्या येथे थांबत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सतत पाठपुरावा करून जत तालुक्यात या गाड्या थांबवण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. तसेच खासदार संजय काका पाटील यांनी देखील जत तालुक्यातील रेल्वेचे प्रश्न सुटण्यासाठी चांगली मदत केली आहे. दरम्यान,या गाडीचे स्वागत झाल्यानंतर येथील रेल्वे कर्मचारी यांचा सत्कार करणेत आला यावेळी प्रकाशजी जमदाडे, एन डी शिंदे सर, शिवाजी शिंदे, स्टेशन प्रबंधक विनय प्रसादजी, प्रशांत विभूते, संभाजी आबा शिंदे, विजय पाटील, तानाजी शिंदे, भीमराव दादा शिंदे, सतीश शिंदे, दिगंबर शिंदे, आशिष शिंदे, महादेव हिंगमिरे उपस्थित होते.

अशी धावणार दीक्षाभूमी एक्सप्रेस:-

१९ फेब्रुवारी पासून दर शुक्रवारी सकाळी ०४:३५ वाजता कोल्हापूर मधून निघून मिरज, कवठे महांकाळ, थांबा घेऊन जतरोडला सकाळी ०७:२०वाजता येऊन ०७:२१ वाजता निघेल.ही गाडी सांगोला,पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, आदिलाबाद, नागपूर, इटारसी, जबलपूर, वाराणसी, गया मार्गे धनबाद ला रविवारी सकाळी ०८:३५ वाजता पोहोचेल.

परतीची गाडी दर सोमवारी सकाळी १०:२० वाजता धनबाद मधून निघून जतरोड येथे बुधवारी सकाळी ०८:५५ वाजता येऊन ०८:५६ वाजता निघेल आणि ला दुपारी १२:४० वाजता पोहोचेल.या गाडीला १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ५ जनरल डबे आहेत.

आपल्याला मोबाईलव्दवारे कुठूनही या रेल्वेचे जतरोड रेल्वे स्टेशनचे आरक्षण करता येईल

जत शहर ते जत रोड-२३ कि.मी. अंतर असुन जत रोड रेल्वे स्टेशन जत-सांगोला एन एच ९६५ जी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शेगावहून १० कि.मी आणि सिग्नहळ्ळीहून ५ कि.मी. अंतरावर आहे.

Post a Comment

0 Comments