मला न्याय द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटूंबासह आत्मदहन करून घेऊ -रावसाहेब हेगडे


जत/प्रतिनिधी: खोटे गुन्हे दाखल करून आमच्या कुटूंबाला नाहक त्रास देणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही सर्व कुटूंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू आशा प्रकारचे निवेदन रावसाहेब राजाराम हेगडे रा. कोसरी ता.जत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

        निवेदनात म्हटले आहे की, दि. ०७/१२/२०२० रोजी संबधीत आरोपी राजू बबन जाधव, विशाल नानासाहेब जाधव, बबन सुभराव जाधव, अरूण बबन जाधव, नानासाहेब सुभराव जाधव, पाडूरंग उर्फ ऋषिकेश रमेश जाधव सर्व रा. कोसारी ता.जत जि.सांगली यांनी संगनमत करून मी मांग समाजाचा माहित असूनही मला ए मांगटया तुझी जिरवायला हवी, असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती. या मारहाणीत माझा भाऊ भाऊसाहेब राजाराम हेगडे, आई मंगल राजाराम हेगडे, पत्नी सौ. कविता रावसाहेब हेगडे, चुलत भाऊ अनिल नामदेव हेगडे हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. सांगली येथे उपचार घेवून आम्ही दि. ०८/१२/ २०२० रोजी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधिक्षक नवले यांनी वर नमुद आरोपीवर गुन्हा नोंदवला होता.
        परंतु जिल्हा परिषद सदस्य सौ.स्नेहलता प्रभाकर जाधव यांचे पती प्रभाकर सोपान जाधव व तानाजी जगन्नाथ कदम दोघे रा.कुंभारी यांनी आपला राजकीय बळाचा वापर करून माझा चुलत चुलत भाऊ संतोष सुखदेव हेगडे याला पुढे करून आमच्यावर मारहाण केल्याची खोटी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही प्रभाकर जाधव यांनी माझ्यावर दबाव टाकून तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र,माझे कुटूंबाला गंभीर मारहाण झाल्याने मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. आता स्वतः प्रभाकर जाधव हे केस मागे घेण्यासाठी राजकीय दबाव टाकून माझेविरूध्द मारहाणीचा दि.०८/१२/२०२० खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर वेळोवेळी माझ्या घराजवळ येवून मला व माझ्या घरच्यांना धमकी देवून जातीवाचक शिवीगाळ करतात. ते अत्यंत खुनशी प्रवृत्तीचे असून सांगतील ते करणारे आहेत. त्यांची समाजात दहशत आहे. ते कोणासही जुमानत नसून पोलिस माझे काय वाकडे करू शकत नाही असे वारंवार सांगतात. एवढेच नव्हेतर ज्या दिवशी वर नमुद खोटा गुन्हा माझेवर दाखल करण्यात आला. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर थांबून होते त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिस अधिका-यांच्या समोर जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून त्यांची खुनशी व धाडशी वृत्ती दिसून येत आहे. तरी वर नमुद माझेवर जत पोलिस ठाणे, जो खोटा गुन्हा दि. १०/१२/२०२० रोजी दाखल झालेला आहे. त्यामध्ये मला वारंवार पोलिस स्टेशनमध्ये बोलावून पोलिसांमार्फत नाहक त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे माझे जगणे अशक्य होवून माझी समाजातील प्रतिमा मलिन झालेली आहे. सदर तक्रारीमध्ये मला अटक करून वरील आरोपी विरोधातील मी दाखल केलेली केस मागे घेण्याबाबत दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचप्रमाणे याबाबतची तक्रार मी जत पोलिस स्टेशन येथे देणेकरिता गेलो असता माझी कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नाही व माझे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही.
        त्यामुळे आपण याची सखोल चौकशी करून संबंधीतावर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व पीडित कुटूंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असे रावसाहेब हेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments