जत तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांची खातेनिहाय चौकशीची मागणी; बसपा


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कामाचा जत तालुक्यातील लोकांना त्रास होत असून त्यांची उच्चस्थारिय यंत्रणामार्फत चौकशीच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना बसपा च्या वतीने दिले आहे.

        निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील सर्व तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या कार्यशैलीचा जत तालुक्यातील लोकांना त्रास होत असून तहसिल कार्यालयाशी संबंधित खरेदी विक्री, दस्ताच्या नोंदी करणे, त्या मंजूर करणे तसेच त्यांचेकडे चौकशीसाठी येणाऱ्या प्रकरणांची चौकशी करुन मुदतीत अहवाल देणे, वारसा नोंदी करणे, अपाक कमी करणे, मा. तहसिलदार यांचेसमोर चालणाऱ्या सर्व केसेस ८५ सेक्शन, रस्त्याच्या बाबतीत, उतारे दुरुस्ती प्रकरणे व इतर अनेक कामामध्ये जाणीवपूर्वक लोकांना व पक्षकारांना वेठीस धरुन पैश्याची अवास्तव माणी करुन जनतेची लुट मा. तहसिलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आम्ही तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याबाबत वेळोवेळी लेखी अथवा तोंडी तक्रारी तहसिलदार व प्रांतआधिकारी यांचेकडे केल्या आहेत. परंतु त्याचा फारसा परिणाम मा. तहसिलदार व मा. प्रांत अधिकारी ह्यांचेवर झालेला दिसून येत नाही. तसेच ह्या दोघां वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अश्या भ्रष्ट व बेजबाबदार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.

         तहसिलदार हे तालुक्याचे प्रमुख असून तालुक्यातील लोकांची बहुतांश कामे ही तहसिल कार्यालयाशी संबंधित आहेत. अश्या महत्वाच्या ठिकाणी लोकांना पैशासाठी वेठीस धरले जात आहे. ही बाब चिंताजनक व गंभीर असून सद्यस्थितीत जत तहसिल कार्यालय हे जनतेला लुटण्याचे केंद्र बनले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी सरळ-सरळ तहसिलदार सचिन पाटील व प्रांतअधिकारी प्रशांत आवटे यांना महिन्याला हप्ता द्याव लागतो असे सांगून पक्षकारांकडून व लोकांच्याकडून पैशाची उघड उघड मागणी करीत आहेत. तरी ही बाब अतिशय गंभीर असून याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे. तहसिलदार सचिन पाटील व तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी ह्यांच्या कारभाराने लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने विनंती करतो की तहसिलदार, मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांच्याकडे प्रलंबित असणाऱ्या सर्व कामांची उच्चस्तरीय व पारदर्शी चौकशीकरुन दोषींच्यावर कडक कारवाई करणेत यावी. अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.

      यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर माने, जिल्हा अध्यक्ष लहरीदास कांबळे, बसपा तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे, महासचिव शरद शिवशरण, शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे व शहराध्यक्ष सुनिल क्यातन इ.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments