शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा... शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनास जाहीर पाठिंबा; संभाजी ब्रिगेड


जत/प्रतिनिधी: केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात शेतकरी विरोधी तीन कायदे केले. पंजाब व हरियाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली मध्ये ७२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुद्धा या आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड'चे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली दि. ०७/१२/२०२० रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात व तालुका स्तरावर शेतकऱ्याच्या सन्मानार्थ निवेदन देत केंद्र सरकारच्या विरोधात 'धरणे आंदोलन' करण्यात आले. तसेच, दि. ०८ डिसेंबर २०२० रोजी संपुर्ण भारत बंदला पाठिंबा देत त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. आम्ही शेतकरी व कामगारांच्या हितासाठी सदैव त्यांच्या सोबत आहोत.

           केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायदा हा शेतकरी विरोधात आहे. म्हणून लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र सरकार हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी या कायद्याच्या विरोधात असतील तर केंद्र सरकार अर्थात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱी विरोधी कायद्यावर तात्काळ विचार करून व शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन तात्काळ कायदा रद्द करावा. अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे.

भारतरत्न काढून घ्या...!!

भारताचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा सन्मान करण्यात आला. मात्र आज शेतकरी अडचणीत असून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात भारतातील सर्व शेतकरी संघर्ष करत आहे. मात्र सचिन तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहे. शेतकरी स्व-संरक्षणासाठी आंदोलन करत आहे हे दिसत नाही का...? शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतात जे धन्य पिकवलेले आहे, तेच खातात आणि त्यांच्याच विरोधात बोलण्याची यांची हिंमत कशी होते...? हे कळायला मार्ग नाही. सहा वर्ष राज्यसभेचे खासदार असताना काय दिवे लावले तेंडुलकरांनी. देश एकसंघ ठेवण्यासाठी साधा एकही लोकहीताचा प्रश्न कधीच विचारला नाही. ही मानसिक व वैचारिक गुलामी आहे. शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तर, त्यांना सन्मानाची वागणूक व पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. अकलेचे तारे तोडणाऱ्याचा 'भारतरत्न' काढून घेतला पाहिजे...! त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार... 'भटाला दिली ओसरी... भट हात पाया पसरी'...! अशीच यांची गत आहे. तेंडूलकरांनी केंद्र सरकारची दलाली करणे बंद करावे.
         देशात सध्या शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही, अशी आमची भुमिका आहे. शेतकऱ्यांना सन्मानात... संभाजी ब्रिगेड कायम मैदानात आहे हे ध्यानी ठेवावे. म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कि, शेतकरी विरोधी काळा कायदा तात्काळ रद्द करा... ऊध्याच्या दि.०६ फेब्रुवारी २०२१ च्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा जाहिर पाठिंबा राहील असे अॕड. मनोज आखरे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, संतोष शिंदे प्रदेश संघटक व श्रेयश नाईक जिल्हाकार्याध्यक्ष यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments