माडग्याळ येथील अपघातात एकजण जागीच ठार


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील माडग्याळ येथे माडग्याळ पासून दोन किलोमीटर अंतरावर ईसार पेट्रोल पंपाच्या जवळ बोलोरो पिकप गाडी मोटरसायकलस्वार जाऊन आदळल्यामुळे एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. नागेश धर्मराया हत्तळी (वय 35 रा. बेंळोडगी ता. जत) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला.

         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, व्होसपेठ ता.जत येथील बुलोरा पिकअप गाडी ही होसपेठ गावाकडे निघाली होती, अंबाबाई मंदिराच्या जवळ पिकअपचे एक्सेल तुटले यामुळे वेगात आसणाऱ्या पिकअपने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्यामुळे मोटारसायकल वरील नागेश हात्तळी हे डांबरी रस्त्यावर आदळून व पिकअप अंगावर पडल्याने ते जागीच ठार झाले.

          तर त्यांच्या सोबत असणारे गुरू मलकरी हात्तळी हा गंभीर जखमी झाला आहे. बेंळोडगी येथील हे दोघेही जतला शेतीच्या कामासाठी गेले असल्याचे समजते जतमधील काम आटोपून आपल्या बेंळोडगी या गावी निघाले होते. माडग्याळ जवळ येताच बोलोरो गाडी समोरून येऊन मोटरसायकलवरच पलटी झाली. यामुळेच मोटारसायकल वरील नागेश हात्तळी हा युवक जागीच ठार झाला आहे. या अपघाताची नोंद उमदी पोलिसात झाली आहे.

Post a Comment

0 Comments