जत तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार


जत/प्रतिनिधी: राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुंबई येथे सत्कार केला. 

          यावेळी जत तालुक्यातील विविध प्रश्न, पक्षाचे संघटन, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयावर आ. सावंत व आ. पटोले यांच्यात चर्चा झाली. आ. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी जत तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी चांगले सहकार्य केले होते, याबद्दल आ. विक्रमसिंह सावंत यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या वाढीसाठी आपल्या नेतृत्वाखाली नेटाने काम करू असे अभिवचन आ. सावंत यांनी दिले.

Post a Comment

0 Comments