महादेव बुरुटे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान


जत/प्रतिनिधी: शेगाव ता.जत येथील कवी, साहित्यिक महादेव बी. बुरुटे यांना सीबीएस न्यूज मराठी मिडिया परिवाराकडून देण्यात येणारा 'साहित्यरत्न पुरस्कार २०२१' नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

         राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे सांगोला येथे होणारा पुरस्कार वितरण सोहळा मर्यादित स्वरूपात घेऊन तालुक्याबाहेरील मान्यवरांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार सीबीएस न्यूज मराठी चे संपादक चांदभैया शेख आणि त्यांचे सहकारी विवेकानंद टेकाळे यांनी बुरुटे यांच्या घरी येऊन महावस्त्र, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व इतर भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महादेव बुरुटे यांनी स्वतःची 'गुलमोहोर आणि इतर बालकविता, भुताचं झाड, शेतकळा व ऋतुरंग' ही चार पुस्तके त्यांना भेट दिली. पुरस्कार स्विकारताना 'माझ्या पंखाविना जगण्याला हा पुरस्कार नक्कीच आणखी बळ देणारा असून मी त्याचा विनम्रपणे स्वीकार करतो आहे' असे उद्गार बुरुटे यांनी काढले. या सन्मानानिमित्त बुरुटे यांचे सर्व स्तरातून सत्कार व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments