ग्रामपंचायत खर्च वेळेत न सादर केल्यास कारवाई: तहसीलदार सचिन पाटील


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणूक दि.१५ जानेवारी २०२१ रोजी झाल्या पण ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या खर्चाची माहिती निवडणूक निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे सादर न केल्यास सबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

        त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, जत तालुक्यात दि.१५/१/२०२१ रोजी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी उमेदवार म्हणून सहभाग घेतलेले आहेत. त्या सर्व उमेदवारांनी दि.१८ जानेवारी २०२१ निवडणूक निकाल झालेपासून एक महिन्याच्या आत शासनाचे टू व्होटर अॅपवर निवडणूक खर्चाची माहिती नमुना नंबर १/२/३/४ मध्ये भरून त्याची प्रत आरओ / एआरओ यांच्या मार्फत तपासणी अंती आरओ यांच्यामार्फत तपासणी पथकाकडे सादर करावी. जे उमेदवार निवडणुक प्रक्रीयेत आलेल्या खर्चाची माहिती सादर करणार नाहीत. त्यांच्या विरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळीच खर्चाची माहिती सादर करावी अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे दिले आहे.

Post a Comment

0 Comments