वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब साळूंखे यांचा कोविड योद्धा म्हणुन राज्यपालांच्या हस्ते गौरव


जत/प्रतिनिधी: व्हसपेट ता.जत चे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक (मुंबई कांदिवली स्टेशन) बाबासाहेब साळूंखे यांचा कोविड योद्धा म्हणुन राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व्हसपेट गावचे माजी सरपंच नामदेव तुकाराम साळुंखे यांचे हे चिरंजीव असुन सन १०९०/९१ बॅच चे पोलिस अधिकारी आहेत. गेली ३० वर्ष पोलीस अधिकारी म्हणुन मुंबई करांची सेवा केली. साळुंखे साहेबांनी ज्या -ज्या पोलीस स्टेशन व विभागात काम केले त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट व जनते मध्ये लोकप्रिय अधिकारी म्हणुन ओळख आहे. असा हा लोकप्रिय अधिकारी कोविड काळात लोकांना सेवा देत असता कधी स्वत:ला कोरोणा झाला समजलं पण नाही. पण जनतेचं प्रेम, मुंबई वाशियांना दिलेली सेवा कामी आली, व या कोरोणा सारख्या भयानक परिस्थितीशी दोन हात करत यातुन सुखरूप बरे झाले, कोविड  काळात स्वत:चा व वेळेचा विचार न करता चोख बंदोबस्त ठेवला, लोकांची , कर्मचारी वर्गाची , अधिकारी यांची काळजी घेतली, कोरोणा रुग्णांना मदत केली, गोर गरीब जनतेला अन्न धान्य वाटप व इतर मदत केली, इतर राज्यातील लोकांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी या लोकांची यादी करुन रेल्वेची सुविधा केली या सर्वांची जेवणाची सोय करून त्यांना त्यांच्या मुळ गावी पाठवण्याचे काम प्रामाणिकपणे काम केले, या सर्व कामांची व या कठिण काळात दिलेल्या अविरत सेवेची पोहोच पावती म्हणुन दि.१९/०२/२०२1 रोजी शिवजयंती चा योग साधुन या कोविड योध्याचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Post a Comment

1 Comments