श्री दानम्मादेवी जत तालुका शेतकरी दूध संघ दुष्काळी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणारा; आ. सावंत । पहिल्याच दिवशी ११ हजार लिटर दुध संकलन
जत/प्रतिनिधी: श्री दानम्मादेवी जत तालुका शेतकरी दूध संघ दुष्काळी भागातील दूध उत्पादक शेतकरी व दूध सोसायट्यांना वरदान ठरणारा आहे. गटातटाचे राजकारण व मतभेद बाजूला ठेवून भविष्यात या दूध संघाची वाटचाल होईल असा आत्मविश्वास आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्त केला. दूध संघाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .

          नव्यानेच सुरु होत असलेला दूध संघ कोणाच्याही खाजगी मालकीचा नाही. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या आन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकारी तत्वावर संघ स्थापन करण्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला शासन दरानुसार हमीभाव मिळत नव्हता यासंदर्भात सतत तक्रारी होत होत्या, त्यासंदर्भात त्यांना येथे न्याय मागता येत नव्हता. जत येथे तालुका पातळीवरील दूध संघ अस्तित्वात नसल्यामुळे अनेक  गैरसोयीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. यापुढील कालावधीत कोणत्याही गैरसोयीचा सामना दूध उत्पादक शेतकरी व संस्थांना सहन करावा लागणार नाही. अशी ग्वाही देऊन आमदार विक्रम सावंत पुढे म्हणाले की, दूध संघाची सुरुवात लहान स्वरूपात होत असली तरी शेतकऱ्यांचा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात या दूध संघाचा नावलौकिक वाढवण्यासाठी संचालक मंडळाने सुरवातीपासून प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

         कार्यक्रमाच्या सुरुवातीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिराजदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी अरुण चौगुले, वरिष्ठ लेखाधिकारी उच्च शिक्षण कोल्हापूर रणजीत झपाटे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बाळासाहेब पाटील, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.बी.जवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्य महादेव पाटील, मल्लेश कत्ती, सुजय शिंदे, अँड. युवराज निकम, गणेश गिड्डे, अतुल मोरे, नाथा पाटील, रवींद्र शिंदे, काका शिंदे, इत्यादी मान्यवर तसेच दूध उत्पादक शेतकरी व सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बाबासाहेब कोडग यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments