सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना फी भरणेबाबत सक्ती करू नये; जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस


जत/प्रतिनिधी: विद्यार्थ्यांना फी भरणेबाबत सक्ती न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून देखील काही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुल करत आहेत. सक्तीची फी वसुली थांबवण्याबाबत जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पवन कोळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अशोक कोळी जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, हेमंत खाडे जिल्हा उपाध्यक्ष आ.रोहित पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य, हेमंत चौगुले उपस्थित होते.

         कोरोना महामारी पार्श्वभुमीवर प्रत्येक व्यवसायाचे नुकसान झाले असल्याने अनेकांना आपले जॉब गमवावे लागलेले असताना अशामध्ये आपल्या मुलांना शाळेमध्ये घालणे व ऑनलाईन शिक्षण देणे देखील अनेक पालकांना जड झाले आहे. कोरोना परिस्थीती आटोक्यात येत नसतानाही शाळांकडुन विद्यार्थ्यांवर फी वसुलीचा जोर वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणतीही खासगी शाळा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना काढुन टाकु शकणार नाही. असे आदेशच सर्व शाळांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शाळांनी पालकांना फी साठी सहा महीन्याचे हप्ते पाडुन द्यावे असे देखील सुचित केले आहे. या उपर जरी पालक फी भरु शकले नाहीत. तरी देखील विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही असे स्पष्ट निर्देश न्यायालयाचे असतानाही जत तालुक्यातील काही खाजगी शाळा व संस्था तसेच इग्लीश मेडीयम स्कुल, दुष्काळी तालुक्यातील पालकांवर फी वसुलीसाठी अन्यायकारक पावले उचलत आहेत. 

        बोर्डाचे ऑनलाईन फॉर्म तसेच प्रॅक्टीकल परिक्षा या करीता विद्यार्थ्यांकडुन फी सक्तीने वसुली करत आहेत. त्या शिवाय बोडचे फॉर्म भरले जाणार नाहीत व तुमचे शेक्षणिक वर्ष वाया जाईल असा दबाव टाकत आहेत. ज्या शाळांकडुन असे प्रकार केले जातील त्यांचेवर आपलेमार्फत योग्य ती कारवाई करावी व त्यांना सुचित करावे की, विद्यार्थ्याच शैक्षणिक नुकसान करु नये व फी साठी सक्ती करु नये व तगादा लावु नये. 

        जत शहरातील काही खाजगी क्लालेस चालकांकडून सोशल डिस्टसिंगचे पालन न करता क्लासेस राजरोसपणे सुरु आहेत. कोराना पार्श्वभुमीवर कोणतीही काळजी घेतली जात नाही. शासनाकडून दिलेल्या सुचनांचे पालन होताना दिसून येत नाही. अत्यंत कमी जागेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र बसवुन क्लासेस घेतले जात आहेत. तसेच क्लास सुटल्यानंतर कोणत्याही प्रकारे निरजंतुकीकरण करत नाहीत. तरी सदर बाबीचा गांभीर्याने विचार करुन संबधीत शाळा, कॉलेज, हायस्कुल व खाजगी क्लालेस यांना योग्य सुचना द्याव्यात अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संबधीतांची पालकमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण विभाग यांचेकडे लेखी तक्रार करेल व त्यांच्यावर कडक कारवाई करणेसाठी आग्रही राहील. असा इशारा यावेळी देणेत आला आहे.

Post a Comment

0 Comments