महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत यांच्या वतीने जत बस आगारात राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा


जत/प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सांगली, ग्राहक पंचायत शाखा जत व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एस टी आगार जत येथे रथसप्तमी/ प्रवासी दिन तसेच छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 

        या वेळी ग्राहक पंचायत पुणे विभाग उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सांगली जिल्हाअध्यक्ष डॉ. विद्याधर किट्टद यांनी उपस्थितानां मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांनी चालू केलेल्या ग्राहक चळवळ व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाची स्थापना 1989 मध्ये झाली. आज रथ सप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचे उत्तरायण सुरू होते. सूर्य हा महाप्रवासी असल्याचे सांगून हा रथसप्तमीचा दिवस प्रवासी दिन म्हणुन संपूर्ण देशात साजरा केला जातो. आपल्या महामंडळाकडून प्रवासी ग्राहकांसाठी देण्यात येणार्‍या सेवा, सुविधा योग्य देणे गरजेचे आहे. चालक व वाहक यांनी प्रवासी ग्राहकाबरोबर सौजन्याने वागणे आवश्यक असल्याचे सांगून उपस्थित सर्व चालक व वाहक यांना ग्राहक पंचायतीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. याप्रंसगी कामगार सेनेचे अध्यक्ष दिनकर पतंगे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी जत आगाराचे आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, वाहतुक निरीक्षक अविनाश कोकरे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक तेजस बुचडे, दिनकर पतंगे, माळी सर, जत तालुका कार्यकारिणी सदस्य प्रा. तुकाराम सन्नके, विजय निंगनूर, मोहसीन इनामदार,  लक्ष्मण बिरादार, महम्मद मुल्ला, ग्राहक पंचायत जतचे राजेंद्र आरळी, अशोक जेऊर, कुंभार, जत आगाराचे सर्व चालक व वाहक उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अविनाश कोकरे यांनी केले तर आभार तुकाराम सन्नक्के यांनी मानले.

Post a Comment

0 Comments