संख येथील अतिक्रमण हटवलेल्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील संख येथे अतिक्रमण हटवल्याने येथील छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ अली आहे. गावातील अनेक छोट्या-मोठया व्यापाऱ्यांनी पतसंस्था, बँकेचे व इतर सावकारी कर्ज काढून दुकाने सुरू केली होती. परंतु सार्वजनिक विभाग खात्याने शासकीय हद्दीत अतिक्रमण झाले म्हणून व्यापाऱ्यांचे खोके हटवले आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या जीवन रोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. 

       संख येथे शासकीय हद्दीत अनेक खोकी धारकानि आपला व्यवसाय सुरू केला होता. त्याचे ग्रामपंचायतीने अकरा महिने भाडे तत्वावर पावती देखील फाडली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याने शासकीय हद्दीत अतिक्रमण झाले म्हणून खोकी हटवली आहेत. परंतु शासकीय हद्दीत असलेली खोकी ग्रामपंचायतीने ११ महिने भाडे तत्वावर काशी काय दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक दुकानदाराने लाख दोन लाख रुपये खर्च करून दुकाने उभी केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दुकाने हटवल्याने त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या व्यापारी वर्गांवर उपासमारीचे वेळ आली आहे. 

        गेल्या मार्च महिन्यामध्ये कोरोना संकट काळाने घाला घातला, तोच सावरतो ना सावरतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्ग पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच आता सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याने रोजीरोटीचा असलेला व्यापार बंद केल्यामुळे अनेक व्यापारी अस्ताव्यस्त झाले आहेत. तर अनेक व्यापारी अघटित घटनाकाडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत का सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार अशी गाव पातळीवर चर्चा सुरू आहे. या दुकानदारानि लाख दोन लाख रुपये खर्च करून माल खरेदी केले आहेत. त्या मालाचे करायचे काय? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. या व्यापाऱ्यांना ग्रामपंचायत मदत करणार का नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. अनेक व्यापारी अक्षरशः अतिक्रमण काडत असताना डोळ्यातून अश्रू आले आहे. दुकान थाटत असताना अनेक व्यापारी सहकारी बँकेचे सावकारी, पतसंस्थेचे कर्ज घेतले आहे. ते कसे फेडायचे या चिंतेत व्यापारी वर्ग आहेत. तरी गाव पातळीवर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

Post a Comment

0 Comments