जत/प्रतिनिधी: आर्थिक वर्ष 2019/20 या वर्ष्यात आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जंयत पाटील यांच्या हस्ते जत तालुक्यातील मौजे देवनाळ या गावास प्रथम क्रमांकाचे 10 लाख रुपयाचे बक्षीस व प्रमाणपत्र सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे प्रदान करण्यात आले.
मौजे देवनाळ या गावाने ग्रामपंचायत स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञान या निकषान्वये तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट कामकाज करुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेबद्दल ना. जंयत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, सरपंच सौ महानंदा ज्ञानदेव दुधाळ, उपसरपंच राजु कुंभार, ग्रामसेवक अदिक कुंभार व सदस्य उपस्थित होते.
0 Comments