राज्य सरकारने सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमावर घातलेली बंदी तात्काळ मागे घ्या; संभाजी ब्रिगेड


जत/प्रतिनिधी: हिंदुस्थानाचे आराध्य दैवत विश्ववंदनिय 'छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी  जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे. जगभरासह देशात व महाराष्ट्रात लाखो शिवप्रेमी मोठ्या उत्साहात दरवर्षि साजरी करीत आसतात. तसेच सरकारचे सर्व नियम    पाळून धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे. मात्र कोरोना (covid-19) चे कारण देऊन सरकारने यावर्षी 'शिवजयंती' कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तसा औरंगजेबी 'फतवा ' सरकारने काढला आहे. या फतव्याचा व ठाकरे सरकारच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध वर्तविणारे पत्र मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष  श्रेयश नाईक यांनी केली.

         मुंबई येथे मा. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्या कार्यक्रमाला राज्य सरकारने' परवानगी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी, व्यासपीठावर शेकडो नेते आणि  हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तेव्हा सरकारला कोरोनाची भीती नव्हती का? मा.धनंजय मुंडे यांच्या स्वागताला परळी येथे हजारोंच्या संख्येने लोक येतात मग मुख्यमंत्र्यांना हे चालते का? राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे. पोलिस त्यांना परवानगी देतात. शिवजयंतीला मात्र बंदी घातली जाते. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र पश्चिम बंगालसह देशभर फिरत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते, मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. 

        तसेच काँग्रेस व शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री महाराष्ट्रभर शेकडो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात मात्र पोलिस त्यांना परवानगी देतात. परंतु शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. हे निषेधार्थ आहे. 'पदवीधर व ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोरात झाल्या, मग शिवजयंतीचा कार्यक्रमावर बंदी का..? महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, शाहिरी, पोवाडे, व्यख्यान, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रम घेऊन समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केले जाते. सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केले जातात. एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवप्रेमी करतो. अशा या सुंदर कार्यक्रमावर महाराष्ट्र सरकार जर बंदी घालत असेल तर हे ते निषेधार्ह आहे. 

         सरकारने काढलेला फतवा तात्काळ पाठीमागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसकट परवानगी द्यावी. वेळ पडली तर मिरवणूक रद्द करा. मात्र कार्यक्रम झाले पाहिजेत. 'अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सरकारने काढलेल्या या फतव्या विरोधात शिवप्रेमी प्रचंड संतापलेला आहे. म्हणून सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ बंदी उठून परवानगी द्यावी. अन्यथा राज्य सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल.

          शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद घालणाऱ्याना शिवजयंतीचे महत्व काय कळणार..! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचे कार्यक्रम अतिशय दिमाखात, चांगल्या पद्धतीने घेणाऱ्या शिवप्रेमींच्या मनाच्या विरोधात जर हे सरकार जाणार असेल किंवा वाद निर्माण करण्याचा, यांची जर नियत असेल. तर हे सरकार शिवद्रोही आहे हे यांच्या निर्णयावरून स्पष्ट होते. सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा अशी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा आहे. राज्य सरकारने शिवजयंती कार्यक्रमाला घातलेली बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा व सरसकट परवानगी द्यावी.

Post a Comment

0 Comments