टोणेवाडी उपसरपंच पदी कमल घोडके


जत/प्रतिनिधी:जत तालुक्यातील टोणेवाडी येथील उपसरपंच पदी सौ. कमल संभाजी घोडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

        जत तालुक्यातील टोणेवाडी हे एकमेव गाव बिनविरोध झाले असून, आज प्रथम सभा घेऊन सरपंच पद रिक्त असल्यामुळे उपसरपंच यांना कार्यभार देण्यात आला आहे. तसेच आज पद स्वीकाराला आहे. टोणेवाडी येथे आरक्षण चुकीचे झाले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सरपंच पदाची उत्सुकता होती. आज टोणेवाडी गावात बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र उत्साहात वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी नूतन उपसरपंच म्हणाल्या कि टोणेवाडी गावातील पिण्याचे पाणी सुविधासह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ यासाठी टोणेवाडी गावातील सर्व विकास कामाबद्दल ग्रामस्थनि सहकार्य करावे. 

        यावेळी मंडळ अधिकारी बुकठे उपस्थित होते. तसेच तलाठी नागेश वाघमोडे, ग्रामसेवक सुदर्शन जाधव, नूतन उपसरपंच कमल घोडके, गोरख टोणे, आप्पासाहेब टोणे, विष्णू नुलके, उत्तम नुलके, अशोक नुलके, पत्रकार नितीन टोणे, ज्ञानेश्वर घोडके, रमेश घोडके, संभाजी चव्हाण, अनिता टोणे, चागुना नुलके, वसंत टोणे, वैशाली हिप्पकर, तुकाराम व्हलगुळे, इंदाबाई नुलके आदीसह टोणेवाडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments