गणेश बागडे यांची मानवाधिकार ह्यूमनराइट काउंसिल च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवडमानवाधिकार राष्ट्रीय संगठन यूनिवर्सल ह्यूमनराइट काउंसिल सांगली जिल्हा अध्यक्षपदी जत तालुक्यातील उमदी येथील गणेश सिध्दाप्पा बागडे यांची निवड करण्यात आली आहे.

         मानवाधिकार राष्ट्रीय संगठन यूनिवर्सल ह्यूमनराइट काउंसिल सांगली जिल्हाध्यक्षपदी बागडे यांची निवड झाली असून त्याच्या या निवडीबद्दल चर्मकार समाज संघटना व बागडे यांच्या मित्र परिवारात आनंदाचे वातावरण दिसत आहे. सर्व सघटनेतन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बागडे हे भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी म्हणूनही काम करीत आहेत. उमदी (विठ्ठलवाडी) येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच ते आखिल भारतीय कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. आपला माणूस पोलिस मित्र संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणुनही काम पाहात आहेत. येणाऱ्या काळात मानव अधिकार काय आहे. मानवाच्या गरजा व अधिकार मिळवून देण्यासाठी मी जिल्हाभर ही संघटना बळकट करून, जनतेच्या गरजा पूर्ण करू, होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू आणि मानव अधिकारी बद्दल जनतेच्या गरजेला पडून त्यांच्या गरजा पूर्ण करू असे निवडीनंतर गणेश बागडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments