जत येथे काँग्रेसच्या वतीने शेतकरी सन्मान संमेलन संपन्नजत/प्रतिनिधी: जत येथे जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी सन्मान संमेलन कार्यक्रम काँग्रेस पक्षाचे निरीक्षक बाळकृष्ण (आप्पा) यादव यांच्या उपस्थितीत पार पडला.

          या शेतकरी सन्मान संमेलनामध्ये उत्तम शेती करणारे शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या तीन काळे कायदे तात्काळ मागे घेण्यात यावेत. दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तसेच या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करणेत यावी व हा शेतकरी विरोधी काळा कायदा मागे घेण्यास भाजप सरकारला भाग पडू असे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक बाळकृष्ण (आप्पा) यादव यावेळी बोलताना म्हणाले.

          यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार माजी पं.स. सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जि.प.सदस्य महादेव पाटील,सांगली मार्केट कमिटी माजी सभापती संतोष पाटील,माजी पं. स.सदस्य मलेश (अण्णा) कत्ती, मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण,नगरसेवक इरणा निडोनी, ओबीसी सेल्स जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी, माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक महादेव कोळी,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे,जत तालुका ओबीसी सेल्स अध्यक्ष काकासाहेब शिंदे,दीपक शिंदे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments