जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कामाची आ.सांवत यांच्याकडून पाहणी


जत/प्रतिनिधी: जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट दिली. यावेळी उद्यानाचे नव्याने सुरू असलेल्या कामाची आमदार सांवत यांनी पाहणी केली. उद्यानात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी बांधण्यात येणाऱ्या चबुतऱ्याची माहिती घेतली. व इंजिनिअर याना बोलावून चबुतऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अश्या सूचनाही दिल्या.

        यावेळी उद्यानात नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक केले. काही सुचनाही दिल्या. उद्यानातील बांधकामासाठी मदत करण्याचेही यावेळी आश्वासन दिले. यावेळी रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते. यावेळी आमदार सांवत यांचा संजय कांबळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला.

Post a Comment

0 Comments