प्रलंबित ऑफलाईन फेरफार नोंदणी कामकाजाबाबत विशेष मोहीम; तहसिलदार सचिन पाटील


जत/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य शासनाचा 7/12 संगणकीकरण हा एक महत्वकांक्षी प्रकल्प असून, राज्यातील सर्व जमिनीचे हस्तलिखित 7/12 पूर्णपणे बंद करून ऑनलाईन 7/12 उपलब्ध करुन देणे हे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील दि. 08 फेब्रुवारी 2021 च्या आदेशान्वये जत तालुक्यामध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी दि. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2021 अखेर विशेष मोहीम घेणेत येणार आहे.

         सदर मोहीमेमध्ये प्रलंबित असणाऱ्या सर्व प्रकाराच्या नोंदीबाबतचे (उदा. दस्त, वारस, कर्जबोजा, साठेखत वगैरे इ.) कामकाज होणार आहे. सदर मोहिमेसाठी तहसिल कार्यालय जत येथे वरील सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारणेसाठी विशेष कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. तरी जत तालुकेतील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे प्रलंबित असणाऱ्या 7/12 संगणकीकरण, नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार नोंदी बाबत आपले अर्ज सदर कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. व दि. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2021 अखेर होणाऱ्या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments