आ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जत/प्रतिनिधी: आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि.४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या शुभहस्ते व सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री डॉ. यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या स्पर्धा जत तालुका युवक काँग्रेस व फायटर क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फुल पिच टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याची माहिती जत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश बनसोडे व सुमित जगधने यांनी दिली.

         यावेळी बनसोडे व जगधने म्हणाले की, या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस ७५ हजार रुपये व चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला ५० हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक विजेत्या संघाला २५ हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक विजेत्या संघाला १५ हजार व चषक असे स्वरूप आहे. मॅन ऑफ दि मॅच विजेत्याला आकर्षक सायकल बक्षीस मिळणार आहे. या सर्व स्पर्धा जत ते सांगली मार्गावरील शासकीय क्रीडा संकुल मैदानावर होणार आहेत.


Post a Comment

0 Comments