जत/प्रतिनिधी: महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी लिंगायत समाजाचे नेते मा. लक्ष्मण जखगोंड हे सांगली जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दि 22 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
याबाबतचे निवेदन मा. जिल्ह्याधिकारी कार्यालय व विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली याना देणेत आले आहे. निवेदनात म्हटले होते की, २०२१ जनगणनेमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून जनगणना व्हावी, लिंगायत समाजास अल्पसंख्यांक दर्जा देणेत यावा, लिंगायत धर्माचा इतर मागास प्रवर्गात ओ.बीसी. म्हणून समावेश कराव, लिंगायत समाजाला सरकारचे विविध सवलती मिळाव्यात. तसेच मंगळवेढा शहरामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा भव्यदिव्य पुतळा उभा करणेत यावा व महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावात लिंगायत समाजाची दफन भुमी/स्मशान भुमीस जागा देणेत यावी, यासह इतर मागण्या सरकारने त्वरीत मान्य करावेत व त्याची अमंलबजावणी करावी. अन्यथा आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २२/०२/२०२१ पासून बेमुदत उपोषणास बसणार बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर लक्ष्मण जखगोंड, अनिल पाटील, राजू कमतगी, रावसाहेब पाटील, बसवराज चौगुले, महादुराय पाटील, प्रशांत भावीकट्टी, लक्ष्मण बिरादार, पीरगोंडा पटेद, शंकर मदभावी, विकास कल्लोळी, महेश मुंडशी आदींच्या सह्या आहेत.
0 Comments