जत शहराजवळील श्री.अंबाबाई मंदिर वनिकरणाला आग । आगीत अनेक वृक्ष भस्मसात


जत/प्रतिनिधी: जत शहराजवळील श्री.अंबाबाई मंदिर वनिकरणाला आग लागून या आगीत तीन ते चार एकरातील वृक्ष आगीत भस्मसात झाले असून या परिसरात वावरत असलेल्या तळीरामांकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याने येथिल वनिकरण खात्याविषयी पर्यावरण प्रेमीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

          या बाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरापासून दोन कि.मी.अंतरावर श्री. अंबिका देविचे मंदिर आहे. या मंदिराचे जवळपास तीनशेवर एकरात वनिकरण विभागाने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षलागवडीमध्ये येथिल विविध सामाजिक संस्था व शाळांचा समावेश आहे. येथील वृक्षसंवर्धनासाठी वनिकरण विभागाने लाखो रूपये खर्च करून वनिकरणासभोवती तारेचे कंपाउंड ही उभारले आहे. तसेच वनिकरणाच्या देखभालीसाठी वनरक्षकांच्या नेमणुका ही केल्या आहेत. असे असतानाही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे येथील वनिकरणासभोवती घालण्यात आलेले तारेचे कुंपन ठिक ठिकाणी काही उपद्व्याप नागरिकांनी काढल्यामुळे या वनिकरणात कोणीही राजरोसपणे आपली जनावरे घेऊन जातो. त्याचप्रमाणे हा वनिकरण परिसर तळीरामांचा व प्रेमीयुगलांचा अड्डा झाल्याने ते मौजमजा करण्यासाठी या परिसराचा वापर करित आहेत. वनविभागाला या प्रकाराची पूर्णपणे माहीती असतानाही ते त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. 

         नुकतेच या ठिकाणी काही तळीराम लोकानी थर्टीफष्ट नविन वर्ष साजरेकरण्याच्या नादात भरपूर मद्य ढोसून मौजमजा करताना येथील वनिकरणाला आग लावण्याचा उद्योग केल्याने त्यामुळे येथिल तीन चार एकरावरील वनिकरणातील वृक्ष आगीत भस्मसात झाले आहेत. येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रकाराला कारणीभूत असून हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी वनिकरण विभागाने या ठिकाणी कायमस्वरूपी वनरक्षक तैनात करावेत पर्यावरण प्रेमीकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments