कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात ज्ञानशिदोरी दिन उत्साहात संपन्न

जत/प्रतिनिधी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात रविवार दि- 17-01-2021 रोजी ज्ञानशिदोरी दिन उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आप्पासाहेब भोसले यांनी केले. यावेळी सकाळ सत्राचे प्रभारी प्रा.सिद्राम चव्हाण, दुपार सत्राचे प्रभारी प्रा.एम.एच करेनवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समनव्यक डॉ शिवाजी कुलाल, प्रा. एस एस नरळे, ग्रंथपाल अभय पाटील आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य आप्पासाहेब भोसले म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपणांस जो ज्ञानदानाचा, शिक्षणप्रसाराचा व समाजसेवेचा वारसा दिला आहे, तोच वसा आणि वारसा आज कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे आपल्या कार्यातून पुढे घेऊन जात आहेत. 

         या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपापल्या वतीने विद्यार्थ्यांनी वाचण्यायोग्य पुस्तके एकत्र जमा केली होती. त्यांचे प्रदर्शन भरवून त्यानंतर ती पुस्तके महाविद्यालयातील गरीब, हुशार, होतकरू व वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'ज्ञानशिदोरी' म्हणून विनामुल्य भेट देणार आसल्याचे सांगितले. या उपक्रमातून वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर होईल व त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होईल. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.एस एस नरळे यांनी केले तर ग्रंथपाल अभय पाटील आभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments