रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या जत तालुक्यातील निवडी जाहीर


जत/प्रतिनिधी: रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धार्थ उर्फ दादासाहेब गायकवाड व त्रुषिकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ रास्ते यांचे अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संपर्कप्रमुख व विविध पदअधिकारी यांची निवड करण्यात आली.

        यावेळी जत तालुका अध्यक्ष पदी हरिश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ रास्ते यांचे हस्ते निवड करण्यात आली व उपाध्यक्ष अमोल आवळे यांची निवड करण्यात आली. तसेच जत तालुका संपर्कप्रमुख अविनाश कुकडे तर जत तालुका उपसंपर्कप्रमुख महमंद मुल्ला तसेच जत तालुक्याच्या सचिव पदी सुनिल देवकुळे यांची निवड करण्यात आली. जत तालुका प्रसिद्धीप्रमुख अमर देवकुळे यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ रास्ते यांनी सर्व निवड केलेल्या पदअधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

         तसेच निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना पूर्ण जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहोत.

Post a Comment

0 Comments