आसंगी ग्रामपंचायतीमधील महापुरुषांच्या फोटोची विटंबना थांबवा- ऑल इंडिया पँथर जिल्हा अध्यक्ष -भुपेंद्रदादा कांबळे


जत/प्रतिनिधी: आसंगी (जत) ग्रामपंचायतीमधील महापुरुषांचे फोटो भिंतीवर्ती न लावता खालती अडगळीच्या ठिकाणी ठेऊन या फोटोंची विटंबना कलेच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर सेनेच्यावतीने आसंगी ग्रामपंचायत येथे निवेदन देण्यात आले.

           निवेदनात म्हंटले आहे की, गावठाण हद्दीतील अतिक्रमण करून बांधलेले घरे व खुली जागा. ग्रामपंचायत रेकॉर्ड प्रमाणे नोंद झालेली माहिती मिळणेबाबत 2000 ते 2021 पर्यंत ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील अतिक्रमण झालेले व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी लोकाकडून लाच घेऊन, खोटी नोंद घातलेली आहे. तरी प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन. दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. याचवेळी ऑल इंडिया पॅंथर सेना निवेदन देत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर या सर्व थोर महापुरुषांचे फोटो ग्रामपंचायत क्लार्कच्या पायाशी ठेवून. या थोर नेत्यांचे अपमान केलेले आहेत. याचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे.

         यावेळी आसंगी गावच्या सर्व ग्रामस्थांसमोर सरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यानी माफी मागावी. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रोश आंदोलन करून, बॉडी बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार व सांगली जिल्हा अध्यक्ष भूपेंद्रदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अमर कांबळे, तालुका उपाध्यक्ष गिरीश सर्जे, तालुका सचिव विकी वाघमारे, अजय  सर्जे, दर्याप्पा  सर्जे,  प्रवीण बाबर, विशाल कांबळे, आप्पासो राक्षे, सिद्धू गायकवाड, सिद्धू सूर्यवंशी व सर्व पॅंथर पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments