जत तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज । मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जमावबंदी आदेश लागू


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचात्तीच्या २४६ सदस्य पदाकरीता दिनांक १५/०१/२०२१ रोजी मतदान झाले असून मतमोजणी सोमवार दिनांक १८/०१/२०२१ रोजी तहसिल कार्यालय समोरील जुने शासकीय धान्य गोदाम क्र. २ येथे सकाळी ८.०० वाजल्या पासून होणार आहे. मतमोजणी करीता एकूण १५ टेबलची रचना करण्यात आली असून यासाठी १५० अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी प्रकियेवर लक्ष ठेवणेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून मा. प्रशांत आवटे उपविभागीय अधिकारी जत यांची निवडणूक आयोगाकडून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ८ फे-या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. १) पहिल्या फेरीमध्ये - उमराणी, वळसंग २) दुस-या फेरीमध्ये - शेगावं, गुगवाड, येळदरी, ३) तिस-या फेरीमध्ये - उटगी, मेंढेगिरी ४) चौध्या फेरीमध्ये - अंकले, कुडणूर, अंकलगी, भिवगी ५) पाचव्या फेरीमध्ये - डोली, धावडवाडी, उंटवाडी, शेडयाळ, सनमडी ६) सहाव्या फेरीमध्ये - घोलेश्वर, गुइडापूर, सिध्दनाथ, जाल्याळ खुर्द, करेवाडी (ति) ७) सातव्या फेरीमध्ये - तिकोंडी, कुलाळवाडी, मोरबगी, सोनलगी, निगडी बुद्रुक व ८) आठव्या फेरीमध्ये - लमाणतांडा (द.ब), लमाणतांडा (उटगी) अशी फेरी निहाय मतमोजणी करण्यात येणार आहे.
         मतमोजणी करीता उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून ओळखपत्रे वितरित करण्यात आली असून ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागाकडून पोलिस उपअधिक्षक, २ पोलिस निरीक्षक, ११ पोलिस अधिकारी, २१५ पोलिस कर्मचारी व २२५ होमगार्ड एवढा बंदोबस्त देण्यात येणार आहे. मा. जिल्हाधिकारी सांगली यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जमावबंदी आदेश लागू केलेला असून त्यामूळे विजयी झालेल्या उमेदवारांना मिरवणूक काढून जल्लोष करता येणार नाही. तरी सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळित व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री सचिन पाटील तहसिलदार जत यांनी केले आहे.
Post a Comment

0 Comments