तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीचे २९ रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत : तहसिलदार सचिन पाटील


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जत तलाठी भवन येथे दि.२९ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी पत्रकारांना दिली.
         जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र. सामान्य- १/का-४ / ग्रा.प./ शा.सं.०१०९/२० दिनांक ८ जानेवारी २०२० अन्वये उपरोक्त कालावधीतील ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची प्रवर्गनिहाय व तालुका निहाय संख्या निश्चित करून अधिसूचना प्राप्त झालेली आहे. त्यानुसार अनुसुचित जाती करीता १४ जागा आरक्षित असुन त्यापैकी सात जागा अनुसुचित जाती महिला प्रवर्ग करीता आरक्षित राहतील. तसेच अनुसुचित जमाती करिता एकुण दोन जागा आरक्षित असुन पैकी एक जागा अनुसुचित जमाती महिला करीता आरक्षित राहिल. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ३१ जागा आरक्षित असुन त्यापैकी १६ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) करीता आरक्षित राहतील. उर्वरित ६९ जागा सर्वसाधारण करिता असून त्यापैकी ३५ जागा सर्वसाधारण महिला करीता आरक्षित राहतील. वरीलप्रमाणे सन २०२० ते २०२५ या वर्षासाठी लागू असलेल्या जत तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ११६ ग्रामपंचारयतिच्या सरपंच आरक्षणाची प्रवर्ग निहाय, तालुका निहाय संख्या निश्चित करणेत आलेली आहे. त्यानुसार जत तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण (अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलासह) सोडत पद्धतीने करणेची कार्यवाही दिनांक २९/०१/ २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता जत येथील तहसिल कार्यलय आवारातील तलाठी भवन येथे निश्चित करणेत येणार आहे.

Post a Comment

0 Comments