जागर फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद; भुपेंद्र दादा कांबळे


जत/प्रतिनिधी: जागर फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जत नगरपरिषदेचे सभापती तथा दलित पॅथरचे जिल्हा उपाध्यक्ष भुपेंद्र कांबळे यांनी जागर फाऊंडेशनच्या वतीने शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता अभियानास सुरवात करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जत नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, जत नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टीमु एडके, जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील, माजी प. स. सदस्य सुभाष गोबी, बाळासाहेब हुंचाळकर, वाघमारे सर, श्रीमंत साळे, दुर्योधन कोडग, युवक नेते योगेश बाबा मोटे, पोलीस नाईक कणसे, आदीजन उपस्थित होते.

          यावेळी बोलताना भुपेंद्र कांबळे म्हणाले की, जागर फाऊंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपली गल्ली व शहर स्वछ राखणे सर्वांचीच जबाबदारी असून परशुराम मोरे व त्यांच्या टीमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले.

यावेळी बोलताना माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टीमु एडके म्हणाले की, जागर फाऊंडेशनला जत नगरपरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जि. प. सदस्य सरदार पाटील बोलताना म्हणाले की, जागर फाऊंडेशने स्वच्छता अभियान हाती घेऊन एक स्तुत्य उपक्रम शहरात राबविला आहे. व ते पुढील काळातही राबवत आहेत. त्यांनी यावेळी पक्षपात न पाहता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments