साळमळगेवाडी खूनप्रकरणी दोघांना अटक । पूर्व वैमानश्यातून केला खून । २४ तासात घटनेचा छडा जत पोलिसांची कारवाई


जत वार्ता न्यूज: तालुक्यातील साळमळगेवाडी येथे दूध व्यवसायिक अजित बाबासो खांडेकर वय २१ रा साळमळगेवाडी ता.जत या तरुणाचा खून केल्याप्रकरणी सिध्दाप्पा लक्ष्मण गडदे (वय २२, रा.साळमळगेवाडी) रमेश सिद्राम खोत (वय २२, रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

        अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री दूध व्यवसायिक अजित खांडेकर या तरुणाचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. ही घटना शुक्रवारी सकाळी ०८.३० वाजनेचे सुमारास साळमळगवाडी ता. जत येथील पडीक जमीनीमध्ये २० ते २२ वर्ष पुरूष जातीचे प्रेत आढळून आले होते. त्याचा गळा कापून, छातीवर वार करून खुन करून ओळख पटु नये म्हणून मयताचे तोंडावर कडबा टाकून चेहरा जाळला होता. सदरची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर मयताची ओळख पटविण्यात आली. सदरचे प्रेत हे अजित खांडेकर याचे असल्याचे त्याचा भाऊ राजू बाबासो खांडेकर यांनी सांगीतले. सदर घटनेबाबत मयताचा भाऊ राजु बाबासो खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करणेत आला होता. आरोपींनी मयताचा चेहरा व कपडे जाळून पुरावा नष्ट केल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांचेसमोर मोठे आव्हान होते.

         सदर गुन्हयातील आरोपीनी अत्यंत निर्घृणपणे मयताचा गळा चिरून खुन केला असलेने गावातील ग्रामस्थांच्या आरोपीविरूद्ध तीव्र भावना होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. दरम्यान अजित खांडेकर यांचा मेहूणा असलेल्या सिध्दाप्पा लक्ष्मण गडदे व रमेश खोत यांनी भांडणाच्या रागातून खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे. संशयित आरोपी दोघे सख्ये मावस भाऊ आहेत. पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

         गुन्हयाचे स्वरूप गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोनि दत्तात्रय कोळेकर उमदी पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासास सुरुवात केली होती. तपासासाठी वेगवेगळे पथके तयार करून रवाना केली. अत्यंत क्लीष्ट व गुंतागुंतीचे खुनाचे गुन्हयाचा तपास कौशल्याने करून सदर गुन्हयातील आरोपीस उघडकीस आणले.

           सदरची प्रकरणात पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोनि दत्तात्रय कोळेकर उमदी पोलीस ठाणे, सपोनि गोपाल भोसले, सपोनि महेश मोहीते व पोलीस कर्मचारी यांनी भाग घेतला होता.


जतकराची पोलिसांवर कौतुकाची थाप:

गेल्या महिन्याभरतातील जत पोलीसांची कामगिरी अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. त्यामध्ये सोने चोरीचा छडा असो किंवा साळमाळगेवाडी प्रकरण असो,....

साळमळगेवाडी येथील युवकाचा निर्घुणपणे गळा चिरून खून करून त्याचा चेहरा व कपडे जाळून पुरावा नष्ट केलेला गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणणे कामी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याबद्दल माननीय पोलीस अधीक्षकसो यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. यापुढे देखील आपण असेच उत्कृष्ट कार्य कराल अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments