राजे रामराव महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जत/प्रतिनिधी : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, महिलांच्या प्रगतीवरून कुटुंबाची, जातीची, समाजाची, राष्ट्राची प्रगती ठरत असते. असे

संविधान शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मानलेल्या गुरूंपैकी एक असलेल्या जोतिबांच्या मार्गाला पुढे संविधानाच्या रुपानं आणखी प्रशस्त करून महिलांना मुक्त भरार्‍या घेण्यासाठी अवघं आकाशच मुक्त केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राजे रामराव महाविद्यालयात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोविला. पुण्यात भिडे वाड्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा काढली ती  आशिया खंडातील मुलीची पहिली शाळा होती. समाजाचा व कुटुंबियांचा विरोध सहन करीत त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे संबोधले जाऊ लागले तसेच त्या पहिल्या शिक्षिका कवयत्री, मुख्याध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. तसेच त्यांच्या सामाजिक कार्य विषयक जीवन परिचय करून देणाऱ्या प्रसंगांचा विचार प्राध्यापक विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवला. आज देशाच्या प्रगतीत त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात असलेलं योगदान आपल्या नजरेसमोर आहे. यावेळी महाविद्यालयातील प्रा.एस एस चव्हाण व प्रा.एम. एच. करेन्नवार सरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन-चरित्रावरील कार्य संबंधित पुस्तकाचे वाचन प्रा.सौ. एन.व्ही. मोरे यांनी केले.

           या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. एच. बोगुलवार, व महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. आर. कुलाळ, प्रा. एस. एस. नरळे, प्रा.एच्.डी. टोंगारे, प्रा. आर. एस. बनसोडे,  प्रा.पी. जे.चौधरी,अतुल टिके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments