जत एस टी आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव निलंबित


जत/प्रतिनिधी: जत एस टी आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांनी स्लीपरकोच एसटी बसची प्रवासी तिकीट आकारणी साध्या दराने करून महामंडळाचे ५१ हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जत एस टी आगारातील कर्मच्याऱ्यात खळबळ माजली आहे.

           याबाबत अधिक माहिती अशी की, विरेंद्र होनराव हे जत येथे आगार व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. स्लिपरकोच जत ते मुंबई एसटी बस येथून सुरू आहे. मुंबई ते जत परत आल्यानंतर ही  स्लिपरकोच एसटी बस जत ते विजापूर , जत ते तुळजापूर दरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी सुरू करून त्याचा तिकीट दर स्लिपरकोच न घेता साध्या दराने घेऊन एसटी महामंडळाचे ५१ हजार रुपयाचे  आर्थिक नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या विरोधात आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

           स्लिपरकोच एसटी बस जत ते मुंबई दरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी महामंडळाने दिली असताना तिचा वापर त्यांनी इतर ठिकाणी केला होता. यासंदर्भात कर्मचारी संघटना व काही प्रवासी नागरिकांनी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून विरेंद्र होनराव यांची चौकशी केल्यानंतर ते चौकशीत दोषी आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे जत आगारातील कर्मचारी आधिऱ्यांत खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments