जत येथील मावशीच्या घरी चोरी करणाऱ्या तरुणास अटक


जत/प्रतिनिधी: जत येथील मथुराबाई गुंडा शिंदे (वय ५८  रा. आर आर कॉलेजच्या पाठीमागे) यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेला त्यांच्या बहिणीचा मुलगा प्रकाश बाबुराव माने (वय ३५ रा. भाळवणी ता.मंगळवेढा) याने १५ ग्रॅम सोन्याची एक बोरमाळ, रोख ५ हजार रुपये व एक मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात मथुराबाई शिंदे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी  प्रकाश याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. मुद्देमाल अद्याप हस्तगत करण्यात आला नाही .

        याबाबत अधिक माहिती अशी की, १४ जानेवारी रोजी रात्री प्रकाश माने हा मथुराबाई शिंदे यांच्या घरी मुक्कामाला आला होता. घरातील सर्वजण झोपले असल्याचे पाहून त्याने घरातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची एक बोरमाळ, रोख  पाच हजार रुपये व मोबाईल घेऊन १५ जानेवारी रोजी पहाटे तो गावी परत गेला होता. घरातील ऐवज लंपास झाल्याचे मथुराबाई शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयावरुन त्याच्याविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकाश माने याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस.ए.कणसे करत आहेत.


Post a Comment

0 Comments