संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

जत/प्रतिनिधी: संत निरंकारी मिशनच्या वतीने जत येथे रविवार दि. १७ जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २०० निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. श्री रामराव विद्यामंदिर हायस्कुल जत येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मार्केट कमीटिचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक गिरमल कांबळे, पापा कुभांर, संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रिय संचालक तसेच मंडळाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश जमदाडे म्हणाले की, आज संपुर्ण देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. निरंकारी मंडळ हे शिबीर आयोजित करुन रक्तदान जिवनदान या घोषवाक्याप्रमाणे जिवनदानाचे काम करीत आहे. मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. मंडळाचे सदस्य निस्वार्थी भावणेने सेवा करतात, संपुर्ण मानव जातीला या मिशनच्या शिकवणीची गरज आहे. त्यानी मिशनच्या कार्याला शुभेच्छा  दिल्या. रक्तसंकलन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यानी केले. यावेळी डाँ शेंडे म्हणाले की, रक्तसंकलना मध्ये मंडळाचा जगामध्ये मोठा वाटा आहे. दरवर्षी फक्त सांगली जिल्हातुन २ ते २.५ हजार रक्तदान मंडळाच्या वतीने होते. मंडळ मानव सेवेमध्ये अग्रेसर आहे. जतचे माननीय आमदार विक्रमदादा सावंत यानी शिबिरास भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास श्री रामराव विद्यामंदिर हायस्कुल चे प्राचार्य भोसले सर व शिक्षक स्टाफ याचे मोलाचे सहकार्य लाभले. 

मंडळाचे स्थानिक मुखी आणि सेवादल संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल स्वयंसेवक आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments