लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा गौरव


जत/प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका शाखेच्यावतीने जत तालुक्यातील लेखक व शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा पत्रकार परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख व तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते सुभाष दादा कुलकर्णी स्मृती साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

          यावेळी श्री.ऐनापुरे यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरवन्यात आले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, डॉ. रवींद्र अरळी, बसवराज पाटील, सुरेश शिंदे, संजय कांबळे आदी उपस्थित होते. श्री.ऐनापुरे यांनी आतापर्यंत आठ विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. शिवाय त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्र "धाडसी कॅप्टन : राधिका मेनन" याचा समावेश बालभारती मराठी आठवीच्या पाठयपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत विविध दैनिकांमध्ये दीड हजारांवर विविध लेख लिहिले आहेत.

Post a Comment

0 Comments