जत ते शेगाव दरम्यान सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या सोन्यावर डल्ला । सोने व्यापाऱ्याला लुटले । पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील जत ते शेगाव दरम्यान माळी वस्तीनजिक चार चाकी गाडीतून सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा तब्बल साडेचार किलो सोने चोरून नेण्यात आला आहे. या प्रकरणी जत पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची तीन पथके तपासाठी रवाना झाले आहेत.

          याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील पळसखेड येथील सोने व्यापारी बाळासाहेब वसंत सावंत हे बेळगावहुन सोने घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून नांदेड येथे सोने देण्यासाठी निघाले होते. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास ते शेगाव जवळील माळीवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले, याचवेळी ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या चार आज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण करून व डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील सव्वा दोन कोटीचे साडेचार किलो सोने  लंपास केले आहे. या प्रकरणी जत पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, एलसीबीचे अधिकारी यांनी भेट दिली आहे. तीन पथके तपासाठी रवाना झाली आहेत.

          सदरची घटना बनवाबनवी आहे का ? वस्तुस्थिती आहे. याची ची पडताळणी पोलिसाकडून केली जात आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक बेळगाव येथे पाठविण्यात आले आहे. सांगली गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी गुरुवारी सकाळपासून जत येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याकडून घटनेची पहानी व इतर घडामोडीची माहिती घेतली जात आहे. ठसे तज्ञ व श्वान सायबर क्राईम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments