जत तालुक्यातील ११६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील ११६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जत तहसील कार्यालय आवारातील महसूल भवन येथे पार पडली. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमणगौडा रवी पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार, मारुती पवार आदींसह तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. काशवी मठपती या लहान मुलींच्या हस्ते सोडत सुरू केली. तालुक्यातील . 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 अखेच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती पुढील प्रमाणे: 

अनुसूचित जमाती:- संख

अनुसूचित जमाती स्त्री:- बोर्गी बू.

अनुसूचित जाती:- अंकले, बनाळी, बेवनूर, डोर्ली, करेवाड़ी (ति), रावळगुंडवाड़ी, वायफळ

अनुसूचित जाती स्त्री:- धावडवाडी, एकुंडी, घोलेश्वर, खैराव, रेवनाळ, टोणेवाडी, उटगी

नागरिकांचा मागास प्रवर्ग:- असंगी तुर्क, बेळोंडगी, भिवर्गी, बोर्गीखुर्द, गिरगाव, हळळी, जालीहाळ बु., कागनरी, खंडनाळ, खिलारवाडी, नवाळवाडी, सिद्धनाथ, वाळेखिंडी, येळदरी, करेवाडी (को).

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:- सिंगनहळळी, सोरडी, वाषाण, अचकनहळळी, अमृतवाडी, असंगी जत, आवंढी, बिळूर, गोंधळेवाडी, गुलगुंजनाळ, कंठी, कासलिंगवाड़ी, कोळगिरी, मुचंडी, निगडी खुर्द, साळमळगेवाडी.

सर्वसाधारण:- अक्कळवाडी, अंकलगी, अंतराळ, बागलवाडी, बागेवाडी, बाज, बालगाव, बसर्गी, बिरनाळ, डफळापूर, दरीबडची, दरीकोनुर, देवनाळ, गुगवाड, गुळवंची, हिवरे, जाडर बोबलाद, करजगी, लमाणतांडा द.ब., लवंगा, लोहगाव, मोटेवाडी, पांडोझरी, प्रतापूर, रामपूर, मल्लाळ, सालेकिरी, सनमडी, मायथळ, शेड्याळ, सोन्याळ, तिप्पेहळळी, उमदी, विठ्ठलवाडी, उमराणी, उंटवाडी, गुड्डापूर.

सर्वसाधारण स्त्री:- बेळूंखी, धूळकरवाड़ी, जालीहाळ खुर्द, जिरग्याळ (शेळकेवाडी), काराजनगी, खलाटी, खोजनवाडी, कोणबगी, कोनत्येबोबलाद (मोटेवाडी), कोसारी, कुडनूर, कुलाळवाडी, कुंभारी, कुनिकोनुर (आबाचीवाडी), लकडेवाडी, लमाणतांडा(उटगी), माडग्याळ, माणिकनाळ, मेंढेगिरी, मिरवाड, मोकाशवाडी, मोरबगी, निगडी बु., पांढरेवाडी, शेगाव, सिंदूर, सिंगणापूर, सोनलगी, सुसलाद, तिकोंडी, तिल्याळ, वज़रवाड, व्हसपेठ, वळसंग, येळवी.

Post a Comment

0 Comments