जत येथे आ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ४ ते ७ फेबुवारी दरम्यान माळरान कृषी, पशु प्रदर्शन व कृषी सन्मान सोहळ्याचे आयोजन

जत/प्रतिनिधी: आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत येथे विक्रम फाऊंडेशन तर्फे दि. ४ से ७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज जत, तहसील कार्यालयाजवळ, माळरान कृषी, पशु प्रदर्शन आणि कृषी सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

         स्वर्गीय पतंगराव कदम यांची प्रेरणा व आदर्श ठेवून आमदार विक्रमसिंह सावंत यांचे स्वप्न होते. जत सारख्या माळरान भागात कृषी प्रदर्शन घेवून इथला शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपली शेती त्यापध्दतीने करन सुख व समृध्दी प्राप्त होतो. म्हणून माळरान कृषी प्रदर्शनाचे आयोजन होत आहे.

         या प्रदर्शनात ३०० हून अधिक स्टॉल्स व ३००० हुन अधिक उत्पादने असणार आहेत. हॉर्वेस्टर, ड्रिप इरिगेशन तसेच शेतीविषयक औजारे व यंत्रसामुग्री, बी- बियाणे, फर्टिलायझर्स, हरीतगृहे, जैव- विज्ञान, पशुपैदास, कुक्कूटपालन, डेअरी मशिनरी, अन्न साठवण प्रक्रिया, प्रकाशने, सॉफ्टवेअर्स इत्यादीचे स्टॉल असणार आहेत.

          प्रदर्शनाचे खास आकर्षण दि. ४ फेब्रुवारी पशु प्रदर्शन, मत्स्य शेतीची प्रात्यक्षिके, मान्यवरांचे शेतीच्या विविध विषयांवर चर्चासत्र, द्राक्ष, बेदाणा, पेरु पिक स्पर्धा, धान्य महोत्सव, शेतकरी ते ग्राहक यांचे स्टॉल, सहजासहजी न मिळणान्या वस्तूंचे कझ्युमर प्रदर्शन, महिला बचत गट व त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहान देण्यासाठी महिला बचत गटाने आयोजित केलेल्या फुड फेस्टिवल, अॅग्रो स्टार्टअप स्वतंत्र पंदव्हेलियन, शासनाच्या विविध योजनाच्या प्रत्यक्ष अमालबजावणी करण्याकरीता सबंधीत अधिकारी यांची उपस्थिती असणार, प्रदर्शनात शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान वापरान शेतीमध्ये प्रगती केलेल्या शेतक-यांचा सन्मान होणार आहे.

        प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ४ फेब्रुवारी रोजी ठीक ११ वाजता होणार आहे. यादेळी दादाजी भुसे मंत्री कृषी, माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य, सुनील केदार मंत्री, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य, मा.अँड यशोमती ठाकूर मंत्री महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य मा.नाम.विश्वजीत कदम, राज्यमंत्री,कृषी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मा.आम.मोहनराव कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.

         तसेच प्रदर्शनाचे नियोजन १५० हुन अधिक कृषी प्रदर्शने भरविण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी रिसोर्सेसचे संचालक राजेश शहा हे पहात आहे. प्रदर्शन पहाण्यासाठी मोफत प्रवेश आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments