आमदार सावंत व तहसीलदार पाटील यांनी घेतला हातात झाडू । जागर फाऊंडेशनच्यावतीने राबिवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला मिळाले बळ


जत/प्रतिनिधी: जत शहरातील जागर फाऊंडेशनच्यावतीने तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत, तहसिलदार सचिन पाटील, जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे, विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.युवराज निकम, कोतवाल सुभाष कोळी, निलेश माने, बाळू कांबळे, बापू सूर्यवंशी, बापू शिंदे, सागर माने, निखिल कलाल, अविनाश साळे, युवराज पाथरुट, पंकज मोरे, लखन देशमुख, विजय मोरे, ओंकार कांबळे, प्रतीक संकपाळ, अभिषेक कांबळे आदी उपस्थित होते.

        यावेळी आमदार विक्रमदादा सावंत व तहसिलदार सचिन पाटील यांनी हातात झाडू घेत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. यावेळी आमदार सावंत म्हणाले की, जागर फाऊंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोणाच्या काळातही त्यांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले काम केले आहे. परशुराम मोरे यांचे कार्य कौतुकास्पद असून ते कलियुगातील संत गाडगेबाबा असल्याचे उदगार काढले. तहसिलदार सचिन पाटील म्हणाले की, स्वच्छता अभियान राबवणे ही काळाची गरज आहे. जागर फाऊंडेशनचे कार्य आदर्शवत असून परशुराम मोरे व त्यांच्या टीमच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा.

Post a Comment

0 Comments